नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , एम एचटी _सी ईटी प्रवेश परिक्षा 21ते एप्रिल दरम्यान – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

एम एचटी _सी ईटी प्रवेश परिक्षा 21ते एप्रिल दरम्यान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा 21 ते 26 एप्रिल दरम्यान होणार*

*परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 163 लागु*

गोंदिया, दि.17 : महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम 2015 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 चे शासकीय, शासन अनुदानित, अनुदानित अल्पसंख्यांक, खाजगी विनाअनुदानित आणि विनाअनुदानित अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा-2026 ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दि.21 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 पर्यंत प्रथम सत्रात आणि दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत व्दितीय सत्रात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

सदर परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी खमारी ता.गोंदिया, शासकीय तंत्रनिकेतन गोरेगाव रोड फुलचूर पेठ गोंदिया, गोंदिया कॉलेज ऑफ फार्मसी चुलोद रोड पांगोली रोड गोंदिया, जे.एम. हायस्कूल न्यू लक्ष्मीनगर रेलटोली गोंदिया, वेदांत औद्योगिक प्रशिक्षण संस्था संत रवीदास वार्ड चंद्रभागा नाका तिरोडा, या परीक्षा केंद्रावर दि.21 ते 26 एप्रिल 2026 सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर परीक्षे दरम्यान कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅल्क्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

हा आदेश परीक्षेच्या कामावर नियुक्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी लागु राहणार नाही. सदर आदेश दि.21 ते 26 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

                                                                    00टी00000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31