नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी*

गोंदिया, 18 : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार युवक आणि युवतींसाठी स्वतःचा उद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय गोंदिया यांना सन २०२६-२७ साठी ४०० प्रकरणांचे उद्दिष्ट मिळाले असून, पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेद्वारे उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी बँक कर्ज सुविधा तसेच शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून, बेरोजगार युवक किंवा युवती असणे गरजेचे आहे. शासनाच्या अटी व नियम लागू राहणार आहेत.

अर्जासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकार फोटो, प्रकल्प अहवाल तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज भरताना “Agency Selection” मध्ये “KVIB” हा पर्याय निवडणे आवश्यक आहे.

योजनेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय गोंदिया, कापसे बिल्डिंग क्रमांक २, शितलामाता चौक, सिव्हिल लाईन, गोंदिया येथे संपर्क साधता येईल.

तसेच जिल्हा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३१७७० असून, उद्योग पर्यवेक्षक निलकीशोर कटरे यांच्याशी ८८०६६९१६७६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930