नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , माजी सैनिकांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

माजी सैनिकांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K*माजी सैनिकांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा*

 

*गोंदिया, दि.30 :* जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी तसेच त्यांच्या विधवांनी शैक्षणीक वर्ष 2024-25 मध्ये बारावी, पदविका तसेच पदवी परीक्षेत किमान 60 % गुणाने उत्तीर्ण होवुन वर्ष 2025-26 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी.डी.एस., बी.बी. एस.बी., सी.ए., बी.एस.सी.(बायोटेक), एम.सी.ए., नर्सिंग, बी.फार्म व इतर व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड दिल्ली यांचेकडुन पंतप्रधान शिष्यवृत्ती देण्यात येते. तरी पात्र माजी सैनिक किंवा विधवांच्या पाल्यांनी केंद्रिय सैनिक बोर्ड दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय गोंदिया येथे दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी केले आहे.

0000000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031