नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तृतीयपंथी व्यक्तींच्या ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

तृतीयपंथी व्यक्तींच्या ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*तृतीयपंथी व्यक्तींच्या ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

 

गोंदिया, दि.9 : तृतीयपंथी या समाजघटकाची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, यासाठी शासन तत्पर असून जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण किशोर भोयर यांनी केले आहे.

 

तृतीयपंथी व्यक्ती यांना कायद्याने निश्चित अशी ओळख देण्याकरिता तृतीयपंथी व्यक्तींनी http://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे.

 

शासनामार्फत तृतीयपंथी या समाजघटकाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलव्ध व्हावी यासाठी तृतीयपंथी व्यक्तींच्या (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ केंद्र सरकारने अंमलात आणला आहे. त्यानुषंगाने तृतीयपंथी व्यक्तीच्या (हक्कांचे संरक्षण) नियम २०२०, दिनांक २५ सप्टेंबर २०२० मधील कलम ५ व कलम ५ नुसार तृतीयपंथी व्यक्तींना केंद्र शासनाच्या http://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांचे स्वाक्षरीचे ओळखपत्र व प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहेत.

 

तृतीयपंथी व्यक्ती असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या http://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर तृतीयपंथी व्यक्तीने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सदर अर्ज करताना तृतीयपंथी व्यक्ती असल्याबाबत विहीत केलेल्या प्रपत्र २ मध्ये ११० च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज शपथपत्र अपलोड करावा.

 

  1. तृतीयपंथी व्यक्तींना सामाजिक संरक्षण प्राप्त करून देणे. तृतीयपंथी व्यक्ती यांच्या हक्काची पायमल्ली होऊ नये यासाठी उपाययोजना करणे. तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे. तृतीयपंथी व्यक्ती यांच्या विकासासाठी त्यांना संघटित करण्याकरिता प्रयत्न करणे. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे. ही या योजनेची उद्यिप्टे असून अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे पाठीमागे, गोदिया येथे संपर्क साधावा, असे श्री किशोर भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K

 

00000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930