|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महिला व बालविकास जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या सदस्य पदाकरिता
संवेदनशील व्यक्तींनी अर्ज करावा
गोंदिया, दि.9 : महिला व बालविकास जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये बाल हक्क, संगोपन, संरक्षण व बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिक समुहाचा एक सदस्य म्हणुन समावेश आवश्यक असतो यासाठी जिल्ह्यातील संवेदनशील व्यक्तींनी अर्ज करावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.बालगृ, 2017/प्र.क्र.211/का.ट. दिनांक 21 मार्च 2018 नुसार बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार शासकीय / अशासकीय संस्थाच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या अनुषंगाने विधी संघर्ष ग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी कलम 2 (21) मध्ये नमुद व्याख्येनुसार बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थाची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
जिल्हा स्तरीय समिती गठीत असुन समितीमध्ये बाल हक्क, संगोपन, संरक्षण व बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिक समुहाचा एक सदस्य म्हणुन समावेश आहे. अशा सदस्याची निवड करण्याकरिता सदर व्यक्ती किमान पदवीधर असावे. बाल हक्क काळजी व सरंक्षण आणि बाल कल्याण क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असुन वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या अशासकीय सदस्याचा कालावधी हा नेमणूकीपासुन 03 वर्षाचा राहील करिता पात्र व्यक्तीनीं आपल्या संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे बातमी प्रकाशित झाल्यानंतर 15 (पंधरा) दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावे.
कार्यालयीन पत्ता :- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, रूम क्रमाक 36, जयस्तंभ चौक, गोदिया.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space







