नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सनदशीर मार्गाने जगणयाची नवी सुरुवात करावी – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

सनदशीर मार्गाने जगणयाची नवी सुरुवात करावी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*सनदशीर मार्गाने जगण्याची नवी सुरुवात करावी*

*: जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले*

गोंदिया, दि.17 : सनदशीर मार्गाने जगण्याची नवीन सुरुवात करावी. ही नवीन पहाट पूर्वाश्रमीच्या नक्षलवादी यांच्या आयुष्यात आलेली असल्याने त्याचा पुरेपूर सकारात्मक उपयोग आयुष्यात करावा, असे आवाहन आज कायदेशीर समर्पण सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 15 पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना आज जिल्हास्तरीय पडताळणी समिती समोर आत्मसमर्पण प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोंदावले बोलत होते. यावेळी समर्पित नक्षलवाद्यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.

या छोटेखानी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त श्री. औटी, पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, नक्षल कक्षाचे पोलीस कर्मचारी आणि समर्पित नक्षलवादी या कार्यक्रमात उपस्थित होते.

हिंसेचा मार्ग सोडून सनदशीर मार्गाची कास समर्पित नक्षलवाद्यांनी धरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोंदावले यांनी यावेळी केले. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्यावतीने समर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ व सुविधा पुरविण्यात येईल, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली. या मिळालेल्या नवीन आयुष्यात नव्या जोमाने व नव्या उत्साहाने सुरुवात करावी अशा शुभेच्छाही त्यांनी याप्रसंगी दिल्या.

जिल्हा प्रशासनाकडून पुनर्वसन झालेल्या समर्पित नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. भामरे यावेळी म्हणाले. समर्पित नक्षलवाद्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासह त्यांचे मूलभूत कागदपत्रही तयार होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नक्षलवाद्यांसाठी असलेल्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुनर्वसन योजनेचा पूर्ण लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामील केले जाईल. याअंतर्गत घरकुल योजना लाभ, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण असे अनेक लाभ येत्या काळात मिळतील. बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. समर्पित नक्षलवाद्यांमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपुरे यांच्यासह 14 स्त्री-पुरुष सहभागी होते.

 

*समर्पित नक्षलवाद्यांनी तयार केलेली बांबूची कलाकृती जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. औटी यांना भेट म्हणून दिली.*

 

यावेळी पोलीस हवालदार मुस्ताक सय्यद, लक्ष्मण घरत, सुरेंद्र हिचामी, अनिल कोरे, सुरेश चंद्रिकापुरे, माधुरी गजभिये, पोलीस नायक संजय कटरे, महाराष्ट्र पोलीस शिपाई लीना मेश्राम, पोलीस शिपाई रमेश उईके, आशिष वंजारी, राजेश तावाडे, सुरेश मडावी, अतुल कोल्हटकर हे पोलीस कर्मचारी नक्षलवादी कक्षामध्ये कार्यरत असून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले ते कर्मचारीही आजच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

 

*आज आत्मसमर्पण प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या पूर्वाश्रमीची नक्षलवाद्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.*

  1.  अनंत ऊर्फ विकास नागपूरे, नागासू, रानो ऊर्फ रामे येशू नरोटे, संतु , रा. पाटनवाढवी, साँगता, रहि. राशीमेटा, प्रताप ऊर्फ समर, अनुजा, लाली ऊर्फ पुजा, दिनेश, रामको ऊर्फ शिला चमरु मडावी, रितु ऊर्फ अर्जुन भिमा दौड्डी, रोशन ऊर्फ मारा इरिया बेडजा, सुभाष ऊर्फ पोज्ना बंडी रख्या, रतन ऊर्फ मनकु कुम्मा पोयाम, अनुराधा*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K.

0000000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930