नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नागपूर विभागातील मुला मुली च्या चमूने पटकावला प्रथम क्रमांक राज्य स्तरीय नेटबाल क्रीडा स्पर्धा समारोह – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

नागपूर विभागातील मुला मुली च्या चमूने पटकावला प्रथम क्रमांक राज्य स्तरीय नेटबाल क्रीडा स्पर्धा समारोह

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K*नागपूर विभागाच्या मुला-मुलींच्या चमूने पटकावला प्रथम क्रमांक*
*राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचा समारोप*

*गोंदिया, दि.20 :* राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. गोंदिया क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या या स्पर्धेत एकूण आठ विभागाच्या संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यात नागपूर विभागाच्या मुला-मुलींच्या चमूने दमदार खेळ करून विजेतेपद पटकावले. राखीव दलाचे पोलीस निरीक्षक राजेश सरोदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
मुलांमध्ये विजेता संघ प्रथम नागपूर विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग व तृतीय पुणे विभाग तर मुलींमध्ये विजेता संघ प्रथम नागपूर विभाग, द्वितीय पुणे विभाग तर तृतीय नाशिक विभागाच्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील 288 खेळाडू या राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व महाराष्ट्र नेटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे दि.18 नोव्हेंबर पासून राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले यांच्यासह महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, उपाध्यक्ष योगेश वाघ, नेटबॉल संघटना संभाजीनगर सचिव ज्ञानेश्वर काळे, फोर्स वन फाउंडेशनचे संस्थापक डॉ.अरुण कावळे, नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे पवन पटले, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र भांडारकर, निवड समितीचे सदस्य डॉ.नारायण मुर्ती यांनी राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यात सहभाग नोंदविला.
0000000

*आम्हाला फॉलो करा – Twitter : @InfoGondia*
*Facebook : DioGondia*

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031