नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , किशोर बालकांना कामावर न ठेवून सामाजिक व कायदा बांधिलकिचे पालन कराच्या – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

किशोर बालकांना कामावर न ठेवून सामाजिक व कायदा बांधिलकिचे पालन कराच्या

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K*किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवून सामाजिक व कायद्याच्या बांधिलकीचे पालन करा*

गोंदिया दि.13: भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य हे बालकांचे मुलभूत अधिकार असून बालकांचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवून सामाजिक आणि कायद्याच्या बांधिलकीचे पालन करावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रा.मो.धुर्वे यांनी बाल दिनाच्या औचित्याने केले.

बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. भारताचे प्रथम प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती असून भारत सरकार हा दिवस बालदिन म्हणून साजरा करते.

केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 मध्ये सुधारणा करून बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयक, 2016 हे विधेयक पारित केलेले असून. हे मुलांच्या रोजगारावर अधिक कठोरपणे बंदी घालते. या अधिनियमानूसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पुर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने/ नियोक्ताने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यांच्याकरीता 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार रूपये ते 50 हजारा रूपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा त्यांना होऊ शकते अशी तरतूद आहे. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयक, 2016 हे विधेयक बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, 1986 मध्ये केलेल्या सुधारणांचा भाग आहे, जे मुलांच्या रोजगारावर अधिक कठोरपणे बंदी घालते.

गोंदिया जिल्हयातील सर्व दुकाने, हॉटेल, गॅरेज, आस्थापना धारकांना, उद्योजकांना, बांधकाम नियोक्ते, विटभट्टी व इतर आस्थापना मालकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये. जिल्ह्यात बाल कामगार आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत सहायक कामगार आयुक्त, खोली क्र.35, तिसरा माळा, नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

00000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930