नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शासन आणि माणुसकीच्या नात्या ने शेतकऱ्यांच्या पाठीशी पालक मंत्री इंद्रनील ना ईक – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

शासन आणि माणुसकीच्या नात्या ने शेतकऱ्यांच्या पाठीशी पालक मंत्री इंद्रनील ना ईक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*शासन आणि माणुसकीच्या नात्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी : पालकमंत्री इंद्रनील नाईक*

 

गोंदिया : शासन आणि माणुसकीच्या नात्याने आपण सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. बाधित शेतकऱ्यांना पुरेपूर मदत मिळावी यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.

आज पालकमंत्री नाईक यांनी गोंदिया जिल्ह्याचा दौरा करून सडक-अर्जुनी, देवरी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया या तालुक्यांमधील अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालकमंत्री नाईक म्हणाले की, जिल्ह्यातील ९०० गावे बाधित झाली असून २९ हजार ५०.४० हेक्टर शेती क्षेत्र बाधित आहे. या अंतर्गत ६० हजार ७३ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या आधी व नंतर झालेल्या पावसामुळे बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानंतर ३३९ गावांचे पंचनामे पूर्ण झाले होते, मात्र पुन्हा झालेल्या पावसामुळे फेरपंचनाम्यांची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

पाहणीदरम्यान मिळालेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याची कार्यवाही थांबवावी, अशा स्पष्ट सूचना नाईक यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिल्या. शेतकऱ्यांना व कास्तकारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

नाईक पुढे म्हणाले, बाधित क्षेत्रातील ३० टक्के पीक विक्रीस परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेणार आहे. या वेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी माझ्यासोबत उपस्थित राहावे असेही सांगितले.

 

राज्यातील सर्वाधिक धान उत्पादन असलेला गोंदिया जिल्हा सर्वाधिक नुकसानीला सामोरा गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक तालुक्यात नुकसानाचे प्रमाण वेगवेगळे असले तरी शासन या संदर्भात योग्य ते निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

ई-पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

या वेळी आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031