नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , महाराष्ट्रात अमृततर्फॅ दिपावली मध्ये होणारे विश्वविक्रमी गडकिल्ले उत्सव – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

महाराष्ट्रात अमृततर्फॅ दिपावली मध्ये होणारे विश्वविक्रमी गडकिल्ले उत्सव

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी गडकिल्ले उत्सव*

• *छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना – विजय जोशी*

*गोंदिया, दि.17 :* महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते. याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र संसोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ने गडकिल्ले उत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे. हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे.

शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या 12 दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण, ज्येष्ठ मंडळीसुद्धा दुर्गाच्या प्रतिकृती साकारतात. नागरिकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीमध्ये, हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये अगदी जमेल तिथे या 12 दुर्गापैकी कोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवावी आणि आपल्या संकेतस्थळावर http://www.durgotsav.com त्यासोबतचे सेल्फी पाठवावेत.

गडकिल्ले उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांच्या चित्रांचे संकलन केले जाईल. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनाच मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने “अभिनंदन पत्र” पाठवण्यात येणार आहे. याशिवाय अमृतने निर्माण केलेल्या ‘अमृत विद्या’ या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून आज घ्यावयाचे धडे या विषयावरील 999 रुपयांचे प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये स्वराज्यरक्षक दुर्ग, शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, कवी भूषण यांची कवने, स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्ययोध्दांच्या परिचयाची श्रृंखला या सर्व गोष्टींचा आस्वाद सहभागी होणाऱ्या सर्वांना मिळेल.

या बारा दुर्गा पैकी एक साकारा प्रतिकृती :- रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग).

गडदुर्ग हे 12 गडदुर्गापैकी कोणताही एक बनवावा. गडदुर्गचा आकार कमीत कमी दोन फुट असावा. जास्तीत जास्त कितीही असावा. सेल्फीमध्ये गडदुर्गचा जास्तीत जास्त भाग दिसेल असा असावा.

गडकिल्ले उत्सव 2025 या कार्यक्रमाचे अनावरण शिवश्रृष्टी हिस्टोरिकल थीम पार्क पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमात अमृतचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे व सिद्धेश्वर वरणगावकर आणि राज्य व्यवस्थापक दिपक जोशी उपस्थित होते. या कार्यक्रम दरम्यान महाराष्ट्रात जास्तीत जास्त आबालवृद्धांनी गडदुर्ग बनवून, त्यासह सेल्फी काढून, गडकिल्ले उत्सवाचे संकेतस्थळावर अपलोड करून शिवरायांना अनोखी मानवंदना देऊया, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K00000000

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031