किशोर बालकांना कामावर न ठेवून सामाजिक व कायदा बांधिलकिचे पालन कराच्या
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवून सामाजिक व कायद्याच्या बांधिलकीचे पालन करा*
गोंदिया दि.13: भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य हे बालकांचे मुलभूत अधिकार असून बालकांचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवून सामाजिक आणि कायद्याच्या बांधिलकीचे पालन करावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रा.मो.धुर्वे यांनी बाल दिनाच्या औचित्याने केले.
बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. भारताचे प्रथम प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती असून भारत सरकार हा दिवस बालदिन म्हणून साजरा करते.
केंद्र शासनाने बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 मध्ये सुधारणा करून बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयक, 2016 हे विधेयक पारित केलेले असून. हे मुलांच्या रोजगारावर अधिक कठोरपणे बंदी घालते. या अधिनियमानूसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पुर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने/ नियोक्ताने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यांच्याकरीता 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार रूपये ते 50 हजारा रूपये पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा त्यांना होऊ शकते अशी तरतूद आहे. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) सुधारणा विधेयक, 2016 हे विधेयक बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, 1986 मध्ये केलेल्या सुधारणांचा भाग आहे, जे मुलांच्या रोजगारावर अधिक कठोरपणे बंदी घालते.
गोंदिया जिल्हयातील सर्व दुकाने, हॉटेल, गॅरेज, आस्थापना धारकांना, उद्योजकांना, बांधकाम नियोक्ते, विटभट्टी व इतर आस्थापना मालकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये. जिल्ह्यात बाल कामगार आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत सहायक कामगार आयुक्त, खोली क्र.35, तिसरा माळा, नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





