|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*जिल्हा क्रीडा संकुलातील कामे अद्ययावत करावी : जिल्हाधिकारी प्रजित नायर*
*• जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या पुनर्रचना प्रस्तावास मान्यता*
*गोंदिया, दि.17 :* मानवाच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. गोंदिया येथे सुसज्ज असे जिल्हा क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आहे. आपल्या आवडीच्या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन खेळाडू आपले करिअर घडवू शकतात तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले तर गोंदिया जिल्ह्याचे नावलौकीक होणार. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील कामे अद्ययावत करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता.17) जिल्हा क्रीडा संकुल समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदेश जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, शिक्षण विस्तार अधिकारी (प्राथमिक) नरेंद्र डहाके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर पुढे म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलातील आवश्यक क्रीडा सुविधांची प्रलंबित कामे प्राप्त निधीनुसार करण्यात यावी. तसेच जिल्हा क्रीडा संकुल समितीचे वास्तु विशारद (Architecture) यांची विहीत पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करुन तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी दिनांक 19 जून 2025 रोजी झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सदर इतिवृत्तास जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने कायम करण्यात आले.
या सभेत जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 24 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करण्याबाबत प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी मंजुरी प्रदान केली. त्यानुसार आता जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी हे असणार. सदस्य म्हणून नगरपरिषद अध्यक्ष/मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा माहिती अधिकारी, वास्तु विशारद असतील, तर सदस्य सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी हे राहतील. अशी माहिती आज झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सभेत देण्यात आली.
00000000
*आम्हाला फॉलो करा – Twitter : @InfoGondia*
*Facebook : DioGondia*
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





