नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया स्वच्छ पारदर्शक पद्धतीने पार पडण्याचे निर्देश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*गोंदिया नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व* *पारदर्शक पद्धतीने पार पडण्याचे निर्देश*
*:जिल्हाधिकारी प्रजीत नायर*
गोंदिया,10 : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या असून 04 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत. नगरपरिषदेतील निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी गोंदिया नगरपरिषद निवडणूक आढावा बैठकीत दिले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत तहसीलदार समशेर पठाण, श्रीकांत कांबळे मुख्य अधिकारी संदीप बोरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निर्देश दिले, कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची पूर्णपणे काळजी घ्यावी. तसेच, पोलीस बंदोबस्त योग्य ठेवावा जेणेकरून कुठलीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता बाळगावी.
निवडणूक प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना होणार नाही यासाठी फ्लाईंग स्पॉट टीम सक्रिय ठेवावे . यासह जिल्ह्यातील पतसंस्था, सहकारी बँका, खाजगी पतसंस्था यामधून कोणताही आर्थिक गैरव्यवहार निवडणुकीदरम्यान होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून असा गैरप्रकार घडल्यास तो लक्षात आणून द्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
गोंदिया नगर परिषदेमध्ये एकूण मतदार संख्या 1 लाख 24 हजार 311 आहे. यामध्ये पुरुष मतदार संख्या 59687 तर महिला मतदारसंघ 64 हजार 616 इतकी तर इतर 08 अशी आहे.
आज सोमवारपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची सुरुवात झालेली आहे. याबाबत कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले याची माहिती चंद्रभान खंडाईत यांनी दिली.
रोज दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील.
17 नोव्हेंबर 2025 ही नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. 18 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधता तपासण्यात येईल.
19 ते 21 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ उमेदवारांची असेल. यानंतर तीन दिवसांच्या आत न्यायालयाकडे अपील करता येईल.
26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह प्रदान करण्यात येईल. उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध ही याच दिवशी करण्यात येईल. 02 डिसेंबर रोजी मतदान तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





