जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 7व 8 नोव्हेंबर ,स्थळ संथागार गोंदिया
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 7 व 8 नोव्हेंबरला*
*गोंदिया, दि.30 :* विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.7 व 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बुध्दिष्ट समाज संघ संथागार, जिल्हा क्रीडा संकुल जवळ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या महोत्सवाअंतर्गत युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारीत नवसंकल्पनावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
हा महोत्सव क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हास्तर युवा महोत्सव योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणार आहे.
महोत्सवामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक- लोकनृत्य गट- सहभाग संख्या 10, लोकगीत गट- सहभाग संख्या 10. कौशल्य विकास- कथालेखन-3, चित्रकला स्पर्धा-2, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी)-2, कविता-3. वर नमुद सर्व स्पर्धा बांबीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील संगीत महाविदयालय, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळ, सांस्कृतीक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, औद्योगीक प्रशिक्षण संस्था इत्यादींनी 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती यांना सहभाग घेता येईल.
प्राविण्यधारकांस रोख पारितोषिक शासनाकडून अनुदान प्राप्त होताच देण्यात येईल. व सहभागी स्पर्धेकांना प्राविण्य/ सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच नवोपक्रम ट्रॅक (विज्ञान प्रदर्शन) विज्ञान आणि तंत्रज्ञान तार्किक विचार, समस्या निराकरण आणि नवउपक्रमाला प्रोत्साहन देणे यावर आधारीत उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पामध्ये जैव तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुध्दीमत्ता, अक्षय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य तंत्रज्ञान, डिजिटल उपयोजना इत्यादी विषयाचा समावेश राहील व पथकामध्ये जास्तीत जास्त 5 युवकाचा समावेश राहील. या शिवाय विकसीत भारत चॅलेंज ट्रॅक अंतर्गत पहिला टप्पा (डिजिटल) विकसीत प्रश्नमंजुषा- 1 ते 15 ऑक्टोबर 2025 (ऑनलाइन), दुसरा टप्पा विकसीत भारत निबंध स्पर्धा (23 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर 2025) (500 शब्दांचा निबंध), तिसरा टप्पा विकसीत भारत संगणक सादरीकरण स्पर्धा राज्यस्तरीय (24 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर 2025), चौथा टप्पा (प्रत्यक्ष) विकसीत भारत चॅम्पीयनशिप (10 ते 12 जानेवारी 2026). वर नमूद विकसीत भारत चॅलेंच ट्रॅकमधील बाबीकरीता My Bharat/My Govt. पोर्टलवर सादर करावी.
या स्पर्धेच्या अटी व शर्ती तसेच सविस्तर माहिती व प्रवेश नोंदणीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संपर्कासाठी जिल्हा युवा अधिकारी सुशील भड (9404736673), निकीता बोरकर- 9112374353, क्रीडा अधिकारी अभय महल्ले (9850424525), वरिष्ठ लिपिक रविंद्र वाळके (9850141445), रितेश पाकमोडे- 9420868603 किंवा dsogondia201@gmail.com यावर संपर्क साधावा. तरी गोदिया जिल्ह्यातील वरील स्पर्धेतील अटी व शर्तीची पुर्तता करणा-या युवक-युवतीनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ए. बी. मरसकोले यांनी केले आहे.
0
,000000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





