फुटबॉल खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*फुटबॉल खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन*
*गोंदिया, दि.24 :* महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महादेवा’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील 13 वर्षाखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या निवड चाचणीतून निवड होणाऱ्या खेळाडूंना दि.14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे जागतिक किर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभुतपूर्व संधी मिळणार आहे.
‘महादेवा’ योजनेअंतर्गत 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडूकरीता जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन दि.31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे सकाळी 9.00 वाजता करण्यात येणार आहे. या निवड चाचणीकरीता गोंदिया जिल्ह्यातील फुटबॉलपटूंनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी केले आहे.
00
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





