बेटर, गोंदिया मित्र नागरिक,प्रशासन आणि जनप्रतिनिधीसाठी सेतुचे काम करणार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*‘बेटर गोंदिया मित्र’ॲप नागरिक, प्रशासन आणि*
*जनप्रतिनिधींसाठी सेतुचे काम करणार*
– *जिल्हाधिकारी प्रजित नायर*
• *‘बेटर गोंदिया मित्र’ ॲपचे अनावरण*
• *नागरिकांच्या सोयीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध*
*गोंदिया, दि.24 :* लोकशाहीमध्ये जनतेला प्राधान्य देऊन प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी जनतेच्या विविध समस्या प्राथमिकतेने मार्गी लावणे आवश्यक असते. नागरिक, प्रशासन व जनप्रतिनिधी यांच्यामधील दुवा साधण्याचे कार्य ‘बेटर गोंदिया मित्र’ ॲपव्दारे होणार, असा विश्वास आज ॲपच्या लाँचच्या वेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘बेटर गोंदिया मित्र’ ॲपचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, पोलीस निरीक्षक नंदिनी चानपुरकर, बेटर गोंदिया संस्थेचे पदाधिकारी डॉ.विकास जैन व दिलीप जैन मंचावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, लोकांच्या प्रशासन व जनप्रतिनिधी यांच्या संबंधित विविध समस्या सोडविण्यासाठी हा ॲप तयार करण्यात आलेला आहे. त्याची उपयुक्तता नागरिकांना होणार आहे. सदर ॲप व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जनतेला वापरता येणार असून या एप्लीकेशनचे फीचर्स समजण्यासाठी फार सोपे आहेत. याचा वापर सर्व वयोगटातील नागरिकांना सहजपणे करता येईल. नागरिकांना त्यांच्या समस्याचे निराकरण ‘बेटर गोंदिया मित्र’ ॲप माध्यमातून करता येऊ शकेल, असेही श्री. नायर यावेळी म्हणाले.
सदर ॲप तयार करण्यासाठी बेटर गोंदिया संस्थेचे मोठे योगदान आहे. या ॲपद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांची सदर ॲपद्वारे प्रशासनामार्फत दखल घेऊन त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यात येईल. सदर ॲपचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेवून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी केले.
‘बेटर गोंदिया मित्र’ ॲपचा वापर सर्वसामान्य जनतेनी कसा करावा याबद्दल संगणकीय सादरीकरणारे बेटर गोंदिया संस्थेचे पदाधिकारी तरुण मनुजा यांनी विस्तृतपणे उपस्थितांना माहिती दिली. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी गोंदियाला चांगले (Better) बनविण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी 7875441601 या व्हॉट्सॲप क्रमांकासह क्यू आर (QR) कोडचे मान्यवरांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विकास जैन यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बेटर गोंदिया संस्थेचे पदाधिकारी अपूर्व मेठी यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक धनंजय देशमुख, सहायक अधीक्षक संजय धार्मिक, बेटर गोंदिया संस्थेचे पदाधिकारी शैलेश अग्रवाल, आशिष चौहान, सावन बहेकार, विपलव जयसवाल, राहुल लालवानी, शिवम बोरकर, करण डोडवानी, आदित्य पांडे, पंकज भोजवानी, पियुष जैन, संकल्प ढेकवार, मनिष डोडानी, प्रेम चांदवानी, प्रियल रामानी, हर्षवर्धन खटवानी, धीरज मानवानी, क्रिश गलानी, मनिष जेठानी, शुभ डोडवानी, मानसी खटवानी, जिया अनवानी, अरुण गौतम, रोशनी डोडानी, काजल कोडवानी, डॉ.सोनिया हॉटचंदानी, विवेक गौतम, जयदिप जस्सानी, अजय शामका, राम लालवानी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





