गोंदिया जिल्ह्य़ाचे शिल्पकार राज्याचे वित्त व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार राज्याचे वित्त व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन*
गोंदिया, दि. 20: गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार राज्याचे वित्त व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री महादेवरावजी शिवणकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्यावर साकरीटोला घाट, सालेकसा रोड आमगाव येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचे दोन पुत्र विजय आणि संजय शिवणकर, नातवंड असा परिवार आहे.
श्री शिवणकर पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळे कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प उभे राहू शकलेत. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली असून त्यांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून संबोधले जातात.
*महादेवराव सुकाजी शिवणकर यांची एकूण वाटचाल* जन्म ७ एप्रिल १९४० जन्मस्थळ आमगाव, जिल्हा गोंदिया, शिक्षण- एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(इतिहास) व्यवसाय शेतकरी (मूळ), माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास)भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्र),२६ जुलै १९७५ रोजी आणिबाणीकाळात तुरुगांत गेले.
*राजकीय वाटचाल* १९७८ ते २००८ पर्यंत निवडणुकीत अजिंक्य विधानसभा सदस्य १९७८ ते १९८९ ( तीन वेळा आमगाव विधानसभा) १९९४ ते २००४ (दोन वेळा आमगाव विधानसभा)कॅबिनेट मंत्री पाटबंधारे, वित्त व नियोजन (१९९९-२००४) संसद सदस्य १९८९ ते १९९४ व २००४ ते २००८, २००४ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत त्यांनी केली होती.
पुस्तके -१) गजाआड (मराठी आणीबाणी काळातील डायरी) २) भारताची आर्थिक स्थिती (मराठी) ३) विदर्भ झालाच पाहिजे (मराठी) ४) केनिया सफारी (मराठी) , शेतकऱ्यांच्या समस्यावर त्यांनी 100 च्या जवळपास लेख लिहिले होते
.
0000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





