महाराष्ट्रात दोन खोकल्या च्या सिरपवर बंदी,डा एथिलीन ग्लायकोल
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*महाराष्ट्रात दोन खोकल्याच्या सिरपवर बंदी* *डाएथिलीन ग्लायकोल (DEG) आढळल्याने* *एफडीएकडून कारवाई*
गोंदिया दि. 8: राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA), मध्यप्रदेश कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोन औषधांच्या सिरप नमुन्यांमध्ये डाएथिलीन ग्लायकोल (DEG) या विषारी रासायनिक घटकाचे प्रमाण परवानगीपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे ही औषधे “अवमानक” (Not of Standard Quality) व “भेसळयुक्त” (Adulterated) असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
संबंधित औषधे पुढीलप्रमाणे आहेत :
1 Respifresh TR Syrup (घटक: Bromhexine Hydrochloride, Terbutaline Sulphate, Guaiphenesin आणि Menthol) 🔹 बॅच क्र.: R01GL2523 🔹 कालावधी समाप्ती: 12/2026 🔹 उत्पादक: M/s Rednex Pharmaceuticals Pvt. Ltd., Survey No. 586 & 231, NR SKF Bearing, Bavla, Bagodara, N.H. 8A, Tal. Bavla, Dist. Ahmedabad, Gujarat – 383220.
2 Relife Syrup (घटक: Ambroxol Hydrochloride, Guaiphenesin, Terbutaline Sulphate आणि Menthol) 🔹 बॅच क्र.: LSL25160 🔹 कालावधी समाप्ती: 12/2026 🔹 उत्पादक: M/s Shape Pharma Pvt. Ltd., Plot No. 4, Sundernagar, Rajkot Highway Road, Shekhpur, Gujarat – 363510.
डाएथिलीन ग्लायकोलमुळे (DEG) विषबाधेचा धोका आढळून आला आहे. ही रासायनिक द्रव्ये अत्यंत विषारी असून शरीरात गेल्यास मूत्रपिंड निकामी होणे, मज्जासंस्थेचे विकार, कोमात जाणे तसेच मृत्यू देखील होऊ शकतो. लहान मुलांसाठी हा धोका अधिक गंभीर आहे.
महत्वाच्या सूचना: वरील दोन्ही सिरपच्या बॅचचे विक्री, वितरण किंवा वापर तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.महाराष्ट्रातील सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक, रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिक यांनी ही औषधे विक्रीस ठेवू नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत. संबंधित परवानाधारकांनी आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त (FDA) कार्यालयास तत्काळ साठा व पुरवठा माहिती सादर करावी, या सूचनांचे पालन तातडीने होणे आवश्यक आहे.
0000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





