पूरग्रस्त भागातील बांधिताना मदतीने आवाहन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पूरग्रस्त भागातील बाधितांना मदतीचे आवाहन
दानदात्यांनी सढळ हाताने मदत करावी
गोंदिया, दि.8 : राज्यातील अतिवृष्टीने उदभवलेल्या पूर परिस्थितीमुळे पूरग्रस्त भागातील बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील दानदात्यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे
पूरग्रस्त बाधितांना मदतीसाठी सर्व शासकीय विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. बांधीत क्षेत्रामध्ये विविध मदतीसोबतच वैद्यकीय मदत देखील आवश्यक आहे. प्रत्येक जिल्हात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे.
जिल्हातील पुरग्रस्त भागात विविध शासकीय व खाजगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच विविध सेवाभावी संस्था, दाते यांच्या सहकर्याने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आपत्कालीन वैद्यकीय सेवा शिबिरे तसेच औषधी, अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तुंचे संकलन व गरजूनां वाटप करण्याचे काम पार पाडत आहे.
जिल्हातील दानदात्यांनी राज्यातील पुरग्रस्तासाठी सहाय्यता करण्यात पुढाकार घ्यावा. इच्छुक दानदात्यांनी पुरग्रस्तासाठी मदत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख डॉक्टर मुकेश येरेपुडे 9518984292 यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे संपर्क करावा, असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





