भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचे अर्ज आनलाईन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन सादर करा*
गोंदिया, दि.8 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रतात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 26.12.2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा ही अट विभागाच्या दिनांक 13.08.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द करुन याऐवजी अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा अशी सुधारणा करण्यात आलेली आहे.
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे निकष*
मूलभूत पात्रता
1) विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
2) विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
3) शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
4) विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
5) विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकुण वर्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
6) सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.
7) विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृहात मिळालेला प्रवेश रद्द करुन म्हणजेच वसतीगृहातील जागा रिक्त करुन स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शैक्षणिक निकष
1) विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी व त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
2) विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे अनिवार्य आहे.
3) अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
4) शिक्षणातील खंड दोन वर्षापेक्षा जास्त नसावा.
5) एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त सात वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त आठ वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल.
6) विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी राहील.
7) अभ्यासक्रमाच्या मध्यावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभास पात्र राहिल.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
2) कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
3) भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा.
4) महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा.
जिल्ह्यातील स्वाधार योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया, या कार्यालयास भेट द्यावी, तसेच acswogondia@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 07182-234117 या भ्रमणध्वणी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया, यांनी केले आहे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





