पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर*
गोंदिया, दि.3 : राज्य निवडणूक आयोगाचे 29 जानेवारी 2026 चे पत्रान्वये जिल्ह्यातील दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार 16 फेब्रुवारी 2026, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार 16 फेब्रुवारी ते शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 24 फेब्रुवारी 2026. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांनी कळविले आहे.
0000000
*गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना*
*28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे*
गोंदिया, दि.3 : अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राने दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. अशा नागरिकांना हा व्यवसाय करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस अशा आर्थिक संकटांमध्ये त्यांना आपले जीवन जगण्यासाठी काम करावे लागते. अशा व्यावसायीक नागरिकांना ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण मिळावे म्हणून ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शंभर टक्के सहाय्य अनुदानावर गटई कामागारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 28 जानेवारी 2026 चे शासन निर्णयानुसार या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी सुधारित निकषासह निर्गमीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 80 हजार रुपये व शहरी भागात 1 लाख रुपये पेक्षा अधिक नसावे. अर्जदार ज्या भागात स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्यांच्या स्वमालकीची असावी.
या योजनेसाठी दि.28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. सदर अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07182-234117 यावर संपर्क साधावा, असे समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.
0000000
*अमृत तर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम*
*सात दिवसीय नि:शुल्क प्रशिक्षण*
गोंदिया, दि.3 : अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लीफ्टमेंट ट्रेनिंग सेंटर (अमृत) यांच्या वतीने सात दिवसीय नि:शुल्क उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश युवक व युवतींना स्वयंरोजगार, उद्योजकता, व्यवसाय नियोजन व आर्थिक स्वावलंबन याबाबत सक्षम करणे हा आहे.
या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय संधी ओळख, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजना व कर्ज प्रक्रिया, मार्केटींग कौशल्य, मुलभूत आर्थिक नियोजन, उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
हा कार्यक्रम पूर्णत: नि:शुल्क असून 18 ते 55 वयोगटातील इच्छुक युवक व युवतींना सहभागी होता येईल. विशेषत: बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार सुरु करण्याची इच्छा असलेले, लघुउद्योजक व नवउद्योजकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
तरी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी (मो. 9112228776) यांनी केले आहे.
0000000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





