दुय्यम निबंधक कार्यालय बंद नागरिकाची तारांबळ
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*सह दुय्यम निबंधक कार्यालय बंद; नागरिकांची मोठी तारांबळ*
सालेकसा तालुका प्रतिनिधी===============✍️दिनेश मानकर ✍️
मो. 9637984105 सालेकसा शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सालेकसा येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय सह दुय्यम निबंधक अधिकारी अनुपस्थित असल्याने अचानक बंद राहिले. त्यामुळे रजिस्ट्रीसाठी दूरदूरून आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
क्रिसमस डेची शासकीय सुट्टी असूनही आज कार्यालय सुरू राहील या अपेक्षेने अनेक नागरिक कार्यालयात दाखल झाले होते. मात्र सह दुय्यम निबंधक अधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी, संगणक ऑपरेटर कोणीही उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कार्यालयाला कुलूप लावून वेळेपूर्वीच बंद करण्यात आले, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
यामुळे महत्त्वाच्या व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांना परत माघारी जावे लागले. “अधिकारी अशा प्रकारे मनमानी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही?” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
या संदर्भात जिल्हा दुय्यम निबंधक अधिकारी के. एस. कांबळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित सह दुय्यम निबंधक अधिकारी रजेवर गेले असले तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा रजा अर्ज सादर केलेला नाही. अशी माहिती त्यांनी दिली.
अचानक कार्यालय बंद ठेवल्याने नागरिकांचे आर्थिक व वेळेचे नुकसान झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





