जांभळी येथील थरारक घटना,पती कडून पत्नीला जिव घेणे हल्ला
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
जांभळी येलोडी येथील थरारक घटना, पतीकडून पत्नीची हत्या व जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जीवानाशी संपवण्याचा कट रचून, 22 डिसेंबर 2025 ला जांभळी येथील मारोती मोडकु ठाकरे वय 61वर्ष पत्नीसह सिताबाई मारोती ठाकरे 55 वर्ष दोघेही बोंडे गावावरून मोटारसायकल ने जांभळी येथे स्वतःच्या गावी येत असतांनी चिचगड धाबे पवनी रोडवर खडी घाट नावाने असलेल्या जंगल परिसरात अचानक मोटरसायकल जंगलाच्या दिशेने वळवून रस्त्याच्या काही अंतरावर पत्नीला ओढत नेऊन तिच्या छातीवर बसून दगडाने डोका व कपाळाच्या भागावर सपासप वार करू लागल्याने रक्तरंजीत झालेली सीताबाई मारोती ठाकरे जोरजोरात ओरडल्याने लोकांचे साह्याने तिचे जीव वाचविण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथे दिल्याने पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून आरोपीस अटक करून महिलेस उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे पाठविण्यात आले . पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले तसेच यु. एन. इंदुरकर पोलीस पथकासह पंचनामा चौकशी करून गुन्हेगारास अटक केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





