नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक क्षेत्रात, सोमवारी रात्री10 वाजेपासून प्रचार संपणार
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*सुधारित बातमी-*
*नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक क्षेत्रात*
*सोमवारी रात्री 10 वाजेपासून प्रचार कार्यक्रम संपणार*
*गोंदिया, दि.28 :* राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषीत केला असून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तसेच मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर 2025 असून मतगणना 3 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 27 नोव्हेंबर 2025 च्या सुधारित आदेशानुसार सोमवारी 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून प्रचार कार्यक्रम संपणार आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी भारतीय नागरिक न्याय संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिलेल्या शक्तीचा वापर करून खालील प्रमाणे प्रतिबंध आदेश जारी केले आहे.
मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सालेकसा या नगरपरिषद/नगरपंचायत मतदार क्षेत्रात रात्री 10.00 वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासून सभा/मोर्चे/ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमन्यास व फिरन्यास मनाई असेल. परंतु ही अट प्रेत यात्रा, विवाह व धार्मिक कार्यक्रम यात्रा अंतर्गत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
0000000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





