नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*संविधानामध्ये सर्व भारतीयांचे हित अंतर्भूत : प्रदिप कुलकर्णी*

• *संविधान अमृत महोत्सवांतर्गत गोंदियात संविधान दिन उत्साहात साजरा*

*गोंदिया, दि.27 :* संविधानामध्ये सर्व भारतीयांचे हित अंतर्भूत असल्याचे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रदिप कुलकर्णी यांनी केले. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत “घर घर संविधान” या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे संविधान दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त डॉ. देवसुदन धारगावे, एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा. दिशा गेडाम, एन.एम.डी. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शशिकांत चौरे व लंजे शिक्षण संस्थेचे सचिव अशोक लंजे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर राज्य गीत व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले.

समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी प्रास्ताविक करताना 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी दररोज संविधानातील एका कलमाचे अध्ययन करावे, असेही त्यांनी सुचविले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदिप कुलकर्णी यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत संविधानाने दिलेल्या अधिकारांवर विशेषतः स्त्री-पुरुष समानता व कामगार कायद्यांवर मार्गदर्शन केले.

उपायुक्त डॉ. देवसुदन धारगावे यांनी वसतीगृहातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना वेळेचे व्यवस्थापन व शैक्षणिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. शशिकांत चौरे यांनी भारतीय संविधान आणि सामाजिक स्थिती यावर भाषण केले, तर प्रा. दिशा गेडाम यांनी मूलभूत कर्तव्ये व नागरिकांची भूमिका स्पष्ट केली. अशोक लंजे यांनी “घर घर संविधान” उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमास विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले, तर आभार आशिष जांभुळकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मुधोळकर, पी.ए. गणवीर, मनिषा टेंभुर्णे, निशांत वाघमारे, अमर बुल, हेमंत घाटघुमर, गिरीधर गोबाडे, निवेदिता बघेले, पुष्पलता धांडे, योगेश हजारे, मानिकराव ईरले, पंकज काळे, लक्ष्मण खेडकर, छाया झोडे, रोहिणी रामटेके तसेच एस-2, बीव्हीजी, क्रिस्टल लिमिटेड कंपनीचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000000

 

*आम्हाला फॉलो करा – Twitter : @InfoGondia*

*Facebook : DioGondia*

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031