नागपूर विभागातील मुला मुली च्या चमूने पटकावला प्रथम क्रमांक राज्य स्तरीय नेटबाल क्रीडा स्पर्धा समारोह
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*नागपूर विभागाच्या मुला-मुलींच्या चमूने पटकावला प्रथम क्रमांक*
*राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचा समारोप*
*गोंदिया, दि.20 :* राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. गोंदिया क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या या स्पर्धेत एकूण आठ विभागाच्या संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यात नागपूर विभागाच्या मुला-मुलींच्या चमूने दमदार खेळ करून विजेतेपद पटकावले. राखीव दलाचे पोलीस निरीक्षक राजेश सरोदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
मुलांमध्ये विजेता संघ प्रथम नागपूर विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग व तृतीय पुणे विभाग तर मुलींमध्ये विजेता संघ प्रथम नागपूर विभाग, द्वितीय पुणे विभाग तर तृतीय नाशिक विभागाच्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील 288 खेळाडू या राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व महाराष्ट्र नेटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे दि.18 नोव्हेंबर पासून राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले यांच्यासह महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, उपाध्यक्ष योगेश वाघ, नेटबॉल संघटना संभाजीनगर सचिव ज्ञानेश्वर काळे, फोर्स वन फाउंडेशनचे संस्थापक डॉ.अरुण कावळे, नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे पवन पटले, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र भांडारकर, निवड समितीचे सदस्य डॉ.नारायण मुर्ती यांनी राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यात सहभाग नोंदविला.
0000000
*आम्हाला फॉलो करा – Twitter : @InfoGondia*
*Facebook : DioGondia*
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





