महाविद्यालय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे.
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज*
*30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे*
*गोंदिया, दि.13 : * महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आलेले आहे.
वर्ष 2024-25 व त्यापुर्वीच्या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबीत असलेले अर्ज निकाली काढायचे आहेत. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती अर्जात काही त्रुटी असल्यास त्याची पुर्तता करुन विहीत मुदतीत सादर करावे. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालय प्राचार्याची राहील, याची खबरदारी घ्यावी. देण्यात आलेल्या कालावधीनंतर याबाबत आलेल्या तक्रारींची दखल या कार्यालयामार्फत घेतली जाणार नाही. याची सर्व प्राचार्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
गोंदिया जिल्हयातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन महाडीबीटी या संगणक प्रणालीवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजर्षी शाहु महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसाईक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निवार्ह भत्ता इत्यादी योजना ऑनलाईन राबविल्या जातात.
शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी व इतर योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि.30 जून 2025 पासुन महाडीबीटी पोर्टल कार्यान्वयीत करण्यात आलेले आहे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत 25% अर्ज भरण्यात आल्याची नोंद झालेली आहे. करीता विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरुन घ्यावे, तसेच महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज तातडीने भरणेबाबत सूचित करावे. तसेच अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी.
00000000
*मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी प्रणालीद्वारे सादर करावे*
*गोंदिया, दि.13 : * इतर मागास वर्ग, विशेष जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागास वर्ष 2024-25 या शैक्षणिक सत्रापासुन हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. शासन धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना वेळेवर व विहीत कालावधीमध्ये योजनांचा लाभ मिळावा, याकरीता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज शैक्षणिक सत्र 2025-26 पासुन महाडीबीटी प्रणालीव्दारे दि.18 ऑगष्ट 2025 पासून स्विकारण्यास सुरुवात झालेली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व शाळेच्या/विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी प्रणालीवर खालील नमुद योजनांचे अर्ज नोंदणीकृत करुन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया या कार्यालयास ऑनलाईन सादर करावे.
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेल्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 5 वी ते 7 वी पर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 8 वी ते 10 वी इयत्तेतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. आठवी ते दहावीत शिकणाऱ्या व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC) मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या व्हीजेएनटी, एसबीसी (VJNT, SBC) विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती (ZP). माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या व्हीजेएनटी, एसबीसी (VJNT SBC) विद्यार्थ्यांना गुणवंत शिष्यवृत्ती (Only Mumbai). पाचवी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC) मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. ट्यूशन फी आणि परीक्षा फी भरणे (VJNT/ SBC). सैनिकी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता.
महाराष्ट्र शासनाच्या https://prematric.mahait.org/Login/Login या संकेतस्थळावर शाळेच्या प्रोफाईलमध्ये प्रवर्गनिहाय विद्यार्थ्यांची नावे युडायस व सरल प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिलेली आहेत. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपलब्ध नावांमधुन योजनानिहाय विद्यार्थ्यांची तपासणी करुन अर्ज पडताळणी करुन कार्यालयास ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत कार्यालयाचे आयडीवर सादर करावे. तसेच वरील नमूद योजनांव्यतिरीक्त उर्वरीत योजनांचे अर्ज मागील सत्राप्रमाणे ऑफलाईन सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालकांनी केले आहे.
0000000
*आम्हाला फॉलो करा – Twitter : @InfoGondia*
*Facebook : DioGondia*
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





