आपले सरकार.केन्द्र चालकाना.आधार संच पूनर्वाटपाची सुचना
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*आपले सरकार केंद्र चालकांना*
*आधार संच पुनर्वाटपाच्या सूचना*
*गोंदिया, दि.30 :* जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया मार्फत प्राप्त (जुने) कार्यरत आधार संच-20 पुनर्वाटप करावयाचे आहेत. त्यानुसार ज्या तालुक्यात/मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरु करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील तालुक्यात/ महसूल मंडळांमध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईट www.gondia.gov.in यावर जाऊन अर्जाचा नमूना, पात्रतेचे निकष व आवश्यक माहिती घ्यावी.
आधार संच मिळण्यास इच्छुक व पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि.10 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथील आवक-जावक शाखेत केंद्र चालकाने आणून द्यावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (आधार प्रकल्प) गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
*आम्हाला फॉलो करा – Twitter : @InfoGondia*
*Facebook : DioGondia*
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





