आधार नोदणी व अद्यावती करण्याचे नविन दर जाहीर अधिक आकारल्यास होणार दंडात्मक कारवाई
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*आधार नोंदणी व अद्यावती करण्याचे नवीन दर जाहीर*
*अधिक दर आकारल्यास होणार दंडात्मक कारवाई*
गोंदिया, दि. 10 : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधार नोंदणी व आधार अपडेट, तसेच अनिवार्य आाधर अपडेट सेवांसाठी सुधारीत दर निश्चित करण्यात आलेले आहेत, निश्चित केलेल्या दराच्या व्यतिरिक्त आकारल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे निर्देशित करण्यात आलेले आहे.
पुढील तीन वर्षासाठी दर बदलण्यात आलेले असून हा कालावधी दि. 01/10/2025 ते दि. 30/09/2028 असा आहे. आधार नोंदणी कामासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने जाहिर केलेले दर खालीप्रमाणे आहेत.
*निशुल्क नोंदणी*
नवीन आधार नोंदणी, बाल आधार 5 वर्षानंतर अद्यावयत करणे (अनिवार्य), डोळयाचे बुब्बुळ, हाताचे ठसे, /बायोमेट्रीक अपडेशन करणे, नागरिकांचे अनिवार्य बायोमेट्रीक अपडेशन करणे (अनिवार्य) (5 ते7 वर्ष वयोगटातील व 15 ते 17 वयोगटातील) डोळयाचे बुब्बुळ, हाताचे ठसे, /बायोमेट्रीक अपडेशन करणे , नागरिकांचे अनिवार्य बायोमेट्रीक अपडेशन करणे (अनिवार्य) (7 ते 15 वर्ष वयोगटातील दि. 01/10/2025 ते पुढील वर्षाकरीता) डोळयाचे बुब्बुळ, हाताचे ठसे, /बायोमेट्रीक अपडेशन करणे ,. या बाबींकरिता कोणत्याही शुल्क आकारला जाणार नाही याची दक्षता सर्व आधार नोंदणी व अद्यावतीकरण केंद्रांनी घ्यावी.
*वस्तू व सेवा करासह 125 रुपये आकारले जातील*
नागरिकांचे अनिवार्य बायोमेट्रीक अपडेशन करणे (अनिवार्य) (17 वर्षावरील) डोळयाचे बुब्बुळ, हाताचे ठसे, /बायोमेट्रीक अपडेशन करणे, सर्व सामान्य नागरिकांचे आधार बायोमेट्रीक अपडेट करणे (डोळयाचे बुब्बुळ, हाताचे ठसे, /बायोमेट्रीक अपडेशन करणे, नाव पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर अपडेट करणेसह यासाठी 125/- शुल्क जीएसटीसह आकारण्यात येईल.
*या कामांसाठी जीएसटी सह 75 रुपये आकारले जातील*
सर्व सामान्य नागरिकांचे आधार डेमोग्राफिक अपडेट करणे (नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नं. अपडेट करणेसह) –
सर्व सामान्य नागरिकांचे आधार Proof of Address (PoA) Proof of identity (Pol) दस्ताएवज अपडेट करणे , SSUP (My Aadhar) पोर्टलद्वारे Proof of Address (PoA) Proof of identity (Pol) दस्ताएवज अपडेट करण्यासाठी 75 रुपये जीएसटी सह आकारण्यात येईल.
*यापुढे कलर प्रिंट साठी 40 तर गृह नोंदणीसाठी 700 रुपये आकारनार*
ई-आधार डाऊलोड करुन कलर प्रिंट देण्यासाठी 40/-(जीएसटीसह) आकारण्यात येणार तर आधार नोंदणी व अपडेशन कामी गृह नोंदणी (Home Enrollment) करणे – 700/- (जीएसटीसह) यापुढे आकारण्यात येईल.
ठरविलेल्या दराप्रमाणे नागरिकांनी आधार अपडेशन करीता जास्तची आकारणी करणाऱ्या केंद्र चालकाविरुध्द तक्रार संबंधित तहसिलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालय (माहिती तंत्रज्ञान विभाग) येथे करण्यात यावी.
यासह याकामी भारतीय विशष्ट ओळख प्राधिकरण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांचे टोल फ्रि क्र. 1947 वर तक्रार नोंदविण्यात यावी. ई-मेल आयडी help@uidai.gov.in यावर सुध्दा तक्रार करता येईल. नागरिकांनी प्रत्यक्ष आधार (Physical Aadhar) चा वापर न करता मास्क आधार mask Aadhar चा वापर करावा जेणकरुन आधारचा गैरवापर होणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार प्रकल्प भैय्यासाहेब बेहरे यांनी केले आहे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





