तृतीयपंथी व्यक्तींच्या ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
*तृतीयपंथी व्यक्तींच्या ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
गोंदिया, दि.9 : तृतीयपंथी या समाजघटकाची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, यासाठी शासन तत्पर असून जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण किशोर भोयर यांनी केले आहे.
तृतीयपंथी व्यक्ती यांना कायद्याने निश्चित अशी ओळख देण्याकरिता तृतीयपंथी व्यक्तींनी http://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे.
शासनामार्फत तृतीयपंथी या समाजघटकाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलव्ध व्हावी यासाठी तृतीयपंथी व्यक्तींच्या (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ केंद्र सरकारने अंमलात आणला आहे. त्यानुषंगाने तृतीयपंथी व्यक्तीच्या (हक्कांचे संरक्षण) नियम २०२०, दिनांक २५ सप्टेंबर २०२० मधील कलम ५ व कलम ५ नुसार तृतीयपंथी व्यक्तींना केंद्र शासनाच्या http://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांचे स्वाक्षरीचे ओळखपत्र व प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहेत.
तृतीयपंथी व्यक्ती असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या http://transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर तृतीयपंथी व्यक्तीने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सदर अर्ज करताना तृतीयपंथी व्यक्ती असल्याबाबत विहीत केलेल्या प्रपत्र २ मध्ये ११० च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज शपथपत्र अपलोड करावा.
-
तृतीयपंथी व्यक्तींना सामाजिक संरक्षण प्राप्त करून देणे. तृतीयपंथी व्यक्ती यांच्या हक्काची पायमल्ली होऊ नये यासाठी उपाययोजना करणे. तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे. तृतीयपंथी व्यक्ती यांच्या विकासासाठी त्यांना संघटित करण्याकरिता प्रयत्न करणे. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे. ही या योजनेची उद्यिप्टे असून अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे पाठीमागे, गोदिया येथे संपर्क साधावा, असे श्री किशोर भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आ
हे.
00000
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





