नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 94205 13193,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पोलिस शिपाई बॅन्डस्मन पदभरती लेखी परिक्षा शनिवारी – BMS News India

BMS News India

Latest Online Breaking News

पोलिस शिपाई बॅन्डस्मन पदभरती लेखी परिक्षा शनिवारी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ* - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील सुमारे पन्नास हजार (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 0K*पोलीस शिपाई बॅन्डस्मन पदभरती लेखी परीक्षा शनिवारी*

*परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 163 लागु*

गोंदिया, दि.01 : गोंदिया जिल्ह्याचे आस्थापनेवर पोलीस शिपाई बॅन्डस्मन पदाकरीता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दि.4 एप्रिल 2026 रोजी पोलीस मुख्यालय कारंजा (गोंदिया) येथे लेखी परीक्षा सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने पोलीस मुख्यालय कारंजा येथे दि.4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी गोंदिया प्रजित नायर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅल्क्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

हा आदेश पोलीस भरती प्रक्रिया 2024-2025 करीता परीक्षेच्या कामावर नियुक्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी लागु राहणार नाही. सदर आदेश दि.4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी कळविले आहे.

00Ω00000 प

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930